मामाचा अल्पवयीन भाचीवर अत्याचार
ब्रम्हपुरी/का.प्र.
महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नावच घेत नाहीत. महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. ब्रम्हपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या एका अल्पवयीन भाचीवर मामाने अनेक वेळा अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पवित्र नात्याला काळीमा फासणार्या मामा विरूद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
ब्रम्हपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादीसह तिच्या दोन मूली वास्तव्यास आहेत. आरोपी सुमित गणेश मेश्राम वय २९ वर्षीय राह. नान्होरी, तह. ब्रम्हपुरी मामाची (चुलत आत्याचा नवरा )अल्पवयीन भाचीवर नजर पडली. त्याने कुठल्याही नात्यागोत्याचा विचार न करता, अल्पवयीन १४ वर्षीय भाचीला जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केले. दि. १२/०६/२०२५ ते १९/०६/२०२५ दरम्यान ब्रम्हपुरी परिसरातील चांदगाव रोडजवळील नहर, मेंडकी-मालडोंगरी रोड आदी ठिकाणी नेऊन तिचे लैंगिक शोषन केले. आरोपी सुमित गणेश मेश्राम याने अल्पवयीन भाचीवर वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दि. १९ जुलै २०२५ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी सुमित गणेश मेश्राम याच्या विरूद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४(२) (एफ), ६४(२)(एम), ६५ सहकलम ४,६,बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक शितल पवन खोब्रागडे ह्या करीत आहेत.