ब्रम्हपुरीत चैत्राच्या घोडयांची ४०० वर्षांची परंपरा आजही कायम

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
शहरातील रेणुका माता मंदिर व भवानी माता मंदिरातून चैत्रच्या दिवशी लाकडी सजविलेल्या घोड्यांची मिरवणूक काढण्यात येते. ही परंपरा तब्बल चारशे वर्षाहून अधिक कालावधीपासून आजतागायत कायम आहे. दोन्ही मंदिरासमोर ढोभरीत ( मातीची हांडी ) आग पेटवून हातात घेऊन नृत्य केला जातो. बाजार चौकात मिरवणूक गेल्यानंतर तेथील माता मंदिरासमोर देखील ढोबरी नृत्य केला जातो. 
ब्रम्हपुरी शहर विद्येचे माहेरघर, क्रीडा नगरी, वैद्यकीय नगरी म्हणून ओळखले जाते. त्याबरोबरच सांस्कृतिक शहर म्हणूनही ओळखले जाते. इतिहासाची साक्ष देणारे दगडी खांब तसेच गोंडकालीन वास्तूच्या खुणा आजही या भागात सापडतात. याच संस्कृतीची साक्ष चैत्रानिमित्त पहावयास मिळते. सदर परंपरा चारशे वर्षाहून अधिक काळापासून सुरु असल्याचे सांगितले जाते. चैत्राच्या दिवशी दिवसभर दोन्ही मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात. सायंकाळी लाकडी घोडे, दोन्ही बाजूला दोन रक्षक सजवून मिरवणूक काढण्यात येते. मंदिरासमोर डफरीच्या तालावर ढोभरी नृत्य केला जातो. सदर ढोभरी नृत्य मिरवणुकीत असतो. फटाक्यांची आतिषबाजी करत ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने बाजार चौकात पोहचते. या निमित्ताने आकाशपाळणे, विविध साहित्य विक्रीसाठी आणले जातात. यावेळी ही मिरवणूक बघण्याकरीता मोठी गर्दी उसळते. माता मंदिरासमोरील ढोभरी नृत्य पाहण्याकरिता प्रेक्षकांची एकच गर्दी होते. या यात्रेमुळे शहरात सांस्कृतिक वातावरण निर्मिती होते.

तुकडोजी महाराजांनी दिली मंदिराला भेट :
सदर मंदिर निर्मिती नंतर तुकडोजी महाराज येथे आले होते. त्याचे फोटो आजही आहेत. बाजूच्य जुन्या कृष्णा टॉकिजच्या जागेवर तुकडोजी महाराज यांच्या भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता.

रे रेणुका माता मंदिराची जागा तालुक्यातील गोगाव येथील सदाशिव कुंभार यांची होती. येथे माठ बनविण्याचा ते व्यवसाय करायचे. त्यांनी मातीची देवीची मूर्ती बनवून येथे स्थापन केल्याचे आमच्या पूर्वजांनी सांगितले होते. त्यावेळी येथे झोपडी होती. रंगारी समजाच्या पूर्वजांनी या मंदिराची देखरेख केली. तर गंगाराम कुर्वे यांनी लाकडी घोडे व दोन पहारेकरी तयार करून ही मिरवणूक सुरु केल्याचेही आमच्या पूर्वजांनी सांगितले होते. - नारायण बोकडे, माजी सरपंच ब्रम्हपुरी ग्रामपंचायत

  Post Views:   70



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी