यवेवरील बाइक्स पार्विंâगमुळे अपघातांची शक्यता

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
आज-काल दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या खुप वाढली आहे. घरोघरी एक कार व दोन तीन बाईक असतात. त्या प्रमाणात रस्ते फार अरूंद झाले आहेत . त्यामुळे लोक घराच्या बाहेर निघाले की त्यांना पार्किंगची समस्या भेडसावते मग तो साधा गावातील रस्ता असो कि हायवे.
अशीच एक समस्या ख्रिस्तानंद चौक ते बस स्टॅण्ड दरम्यान नंदू ट्रेडर्स व  को. ऑपरेटिव्ह बँक या दरम्यान जी लहान दुकाने आहेत तिथे दुपारी थोडी कमी पण संध्याकाळी व रात्री तिथे त्या दुकानासमोर असंख्य बाइक्स ची ईतकी रॉंग पार्किंग असते कि जवळपास दहा ते पंधरा फूट अंतरापर्यंत तिथे डांबर रोड वर बाइक्स ची गर्दी असते. अशावेळी रस्त्याने जे इतर वाहने, बाईक वाले, सायकल वाले व पायी चालणार्‍यांना त्याचा खूप त्रास होतो. अशावेळी केव्हा कुणाचा अपघात होईल हे सांगता येत नाही कारण तिथून जायला यायला जागाच नसते. यामुळे या ठिकाणी सिनियर सिटीझन, लहान मुले , स्त्रीयांना मार्गक्रमण करतांना जास्त धोका आहे.
तसे पाहिले तर तेथील दुकाने हायवे च्या बरेच आत आहेत पण तेथील ग्राहक आपल्या बाइक्स रस्त्यावर अस्ताव्यस्त लावतात. प्रशासन बरेचदा एखादी घटना घडल्यावर खाडकन जागे होत असते म्हणून एखादी अप्रिय घटना घडायच्या आत जर लक्ष दिले तर चांगल होईल. यांवर काहीतरी नियंत्रण आवश्यक आहे. सदर समस्येकडे पोलिस प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी समाजसेवक राजू भागवत सर यांनी केलेली आहे.

  Post Views:   22



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी