सहकार भारती ब्रम्हपुरी तालुका व नगर कार्यकारिणी गठित

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
 नुकतीच सहकार भारतीच्या विभाग व जिल्हा पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ब्रम्हपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. 
 ब्रम्हपुरी तालुका कार्यकारीणीमध्ये अध्यक्ष पदी तुळशीदास राऊत, अनिल दोनाडकर उपाध्यक्ष, संजय मेश्राम महामंत्री, संजय लांडे सचिव, डॉ. विलास मैंद संघटन प्रमुख, अरविंद ओबोरकर तर सदस्य पदी विनायक शेन्डे, जयघोष सहारे, मंजीरी राजनकर व रश्मी रापेल्लीवार तसेच नगर कार्यकारीणी वसंत कावळे अध्यक्ष, डाकराम दोनाडकर उपाध्यक्ष, संतोष नंदुरकर महामंत्री, संदिप भानारकर सचिव, रामप्रकाश देशकर संघटन प्रमुख, पुजा कात्यायन महिला प्रमुख तर सदस्यांमध्ये मनोहर शन्डे, अल्का ढवळे, राजश्री मुंडे, अपर्णा श्रीकोंडवार, अल्का निमजे यांचा समावेश आहे. सदर निवडीची जिल्हा अध्यक्ष सतिश वासमवार हयांनी घोषणा केली. 
 तत्पूर्वी सहकार गीत गायनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. बैठकीला विभाग सहप्रमुख विजय गोटे, ज्येष्ठ सदस्य दत्ताजी कात्यायन व सतिशजी वाससवार यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा महामंत्री पुष्पा गोटे, प्रभु वाघधरे जिल्हा उपाध्यक्ष व राजेश कावलकर संघटन प्रमुख यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व परिचय संजय मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन मंजिरी राजनकर यांनी केले.

  Post Views:   111



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी