ब्रम्हपुरी नगराध्यक्षपदी काँग्रेसचे योगेश मिसार विजयी

भाजपाचा दारूण पराभव
   

ब्रम्हपुरी/का.प्र.
         विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने निवडणूकीत घवघवीत यश प्राप्त केले. काँग्रेसचे उमेदवार योगेश मिसार यांनी निकटम प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे प्रा. सुयोग बाळबुद्धे यांचा ९५७३ मतांनी पराभव केला. बसपाचे निहाल ढोरे हे तृत्तीय क्रमांकावर राहीले. नगरसेवक पदाच्या एकुण २३ जागांपैकी काँग्रेसने २१ जागांवर विजयश्री खेचून आणला. तर भाजपा व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाने ब्रम्हपुरी नगर पालिकेवर एकहाती सत्ता प्राप्त करीत नगर पालिका सभागृहात स्पष्ट बहुमत प्राप्त केले.
 नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार योगेश बालाजी मिसार यांना १५४०८ मते मिळाली. माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पक्षाचे प्रा.सुयोग बाळबुद्धे यांना ५८३५ मते प्राप्त झाली. बहुजन समाज पार्टीचे निहाल ढोरे यांना ८३२, तिसर्‍या आघाडीचे शिवसेना (उबाठा) चे मिलिंद भनारे यांना ७३० मते प्राप्त झाली. 
  प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे. 
प्रभाग क्रमांक १. (अ) काजल तलमले (काँग्रेस) (१०९२ मते), (ब)चंद्रकांत बावनकुळे (काँग्रेस) (९५३ मते), 
प्रभाग क्रमांक २ (अ) बबिता आमले (काँग्रेस) (१४८९ मते), (ब) प्रकाश खोब्रागडे (काँग्रेस) (९३० मते), 
प्रभाग क्रमांक ३ (अ) मनोज कावळे (काँग्रेस) (११०२ मते), (ब) रेणू ठेंगरे (काँग्रेस) (१२६१ मते), प्रभाग क्रमांक ४(अ) अनुकूल शेंडे (काँग्रेस) (६७५ मते), (ब) जयश्री कुथे (काँग्रेस) (६४७ मते), 
प्रभाग क्रमांक ५ (अ) सतीश हुमणे (काँग्रेस) (९५३ मते), (ब) रंजना पिसे (काँग्रेस) (११०४ मते),
 प्रभाग क्रमांक ६ (अ) हेमलता सिंहगडे (काँग्रेस) (९७१ मते),(ब) जगदीश (मोंटू) पिलारे (काँग्रेस) (१३९९ मते), 
प्रभाग क्रमांक ७(अ)गीता मेश्राम (काँग्रेस) (९५८ मते), (ब) सचिन राऊत (काँग्रेस) (८६४ मते)
 प्रभाग क्रमांक ८ (अ)पुष्पलता पोपटे (काँग्रेस) (१०१० मते), (ब) नितिन उराडे (काँग्रेस) (१२०१ मते), 
प्रभाग क्रमांक ०९ (अ) मनोज भूपाल (भाजपा) (८३५ मते), प्रभाग क्रमांक ९(ब)सपना बल्लारपुरे (काँग्रेस) (९०० मते), 
प्रभाग क्रमांक १०(अ) राकेश पडोळे (काँग्रेस) (९९२ मते),(ब) ज्योती राऊत (काँग्रेस) (८०२ मते) प्रभाग क्रमांक ११ (अ) माधुरी उपासे (काँग्रेस) (२०५५ मते),(ब) रंजना बुराडे (काँग्रेस) (१९८८ मते), प्रभाग क्रमांक ११ (क) अविनाश राऊत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (१२६२ मते)यांचा समावेश आहे. 
 काँग्रेस पक्षाने नगरपालिका निवडणूकीत २३ पैकी २१ जागांवर एकहाती सत्ता स्थापित केले असून हा मतदारांचा कौल असल्याचे बोलले जात असून ब्रम्हपुरी नगर पालिका क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचा सुफडा साफ झाला आहे. भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका नगर पालिका निवडणूकीत पहायला मिळाला. या निकालामुळे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांना मोठा धक्का बसला. भारतीय जनता पक्षाचे नुकतेच निवडून आलेले नगरसेवक मनोज भूपाल हे अवघ्या ०७ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अविनाश राऊत केवळ ०१ मताधिक्याने निवडून आले.

  Post Views:   1633




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी