ने.हि. महाविद्यालयात मुलींना मोफत सायकल वितरण
ब्रम्हपुरी/का.प्र.
स्थानिक नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात मानव विकास योजनेअंतर्गत प्राप्त निधितून महाविद्यालयातर्फे विद्यार्थीनींना सत्र २०२४-२०२५ मध्ये ७५ सायकलचे वितरण करण्यात आले.
सायकल वितरण सोहळयाप्रसंगी संस्थेचे सचिव अशोकजी भैया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एच. गहाणे, उपप्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आनंद भोयर सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे डायरेक्टर विनोद नरड सर, वरिष्ठ लिपीक शशिकांत माडे, गोपाल करंबे यांचेसह शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.