ब्रम्हपुरीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
समाजात मानसिक आरोग्याबद्दल जाणीव जागृती व योग्यवेळी उपचार मिळावा म्हणुन जे.जे. मेडीकल्स अॅ ण्ड मल्टीस्पेशालिटी क्लिनिकच्या वतीने  ब्रम्हपुरी येथे दि. १३ एप्रिलला मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात नागपूर चे  सुप्रसिद्ध न्यूरो सायकीयाट्रिस्ट व अल्कोहोल व्यसनमुक्ती तज्ञ डॉ. प्रणव पोहाने यांनी उपस्थित रूग्ण, नातेवाईक व जनतेला मार्गदर्शन केले.
शिबिरात १०० हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी, मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात आले. विशेषतः मानसिक तणाव, नैराश्य, चिंता, झोपेची समस्या, अल्कोहोल व्यसन, लैंगिक समस्या व  इतर मानसिक समस्यांवर  मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनामागे महत्वाचा वाटा असलेले जे.जे. मल्टीस्पेशालिटी क्लिनिक अॅाण्ड मेडिकल्सचे संचालक प्रतीक कोहळे यांनी समाजात सकारात्मक बदल घडवुन आणण्याच्या दृष्टीने भविष्यातही अशी  शिबिरे  आयोजित करत राहण्याचा मानस व्यक्त केला.

  Post Views:   39



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी