बालाजी राईस प्रॉडक्ट प्रा. लि. कर्मचाऱ्यांच्या वतीने अशोकजी भैय्या यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
ब्रम्हपुरी/का. प्र.
ब्रह्मपुरी नगरपालिकेची प्रथम नगराध्यक्ष, नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव, हजारों हातांना रोजगार देणारे प्रसिद्ध उद्योजक अशोकजी भैय्या यांचा वाढदिवस बालाजी राईस प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कुर्झा येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बालाजी राईस प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कुर्झा येथील कर्मचाऱ्यांनीं कार्यालयाची सुंदर सजावट केली होती. बालाजी राईस प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कुर्झाचे संचालक अशोक भैय्या यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. प्रसंगी येथील संपूर्ण कर्मचाऱ्यांना अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. बालाजी राईस प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कुर्झा येथील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.