ने. हि. कनिष्ठ महाविद्यालय,ब्रम्हपुरीचे प्रा. प्रफुल्ल पराते यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
MS-Word आणि MS-Excel स्पर्धेत चमकदार कामगिरी
ब्रम्हपुरी:-
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERTM), पुणे द्वारा शिक्षणक्षेत्राशी संबंधित शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांचेतील कौशल्य व नवकल्पना विकसित करण्याच्या उद्देशाने सत्र 2025-26 पासून 'शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा' चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत डाअट,आंबेजोगाई जि. बीड द्वारा घेण्यात आलेल्या MS-Word आणि MS-Excel राज्यस्तरीय स्पर्धेत नेवजाबाई हितकारिणी कनिष्ठ महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथील प्रा. प्रफुल्ल देवराव पराते यांनी आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने राज्यात राज्यस्तरीय स्पर्धेचे विजेते होण्याचा बहुमान प्राप्त केला.
संगणक विषयातील त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे व तांत्रिक कौशल्यामुळे त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
प्रा. प्रफुल्ल पराते यांचे राज्यस्तरीय स्पर्धेतील यशाबद्दल ने. भै. हि. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताबाई भैया, सचिव अशोकजी भैया व संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर, पर्यवेक्षक प्रा. आनंद भोयर आई-वडिल, पत्नी खूशी पराते, बहिण ममता उमरेडकर तथा शिक्षकवृंद व प्रशासकीय कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.