ने.हि. महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाला राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धेत कांस्यपदक
ब्रम्हपुरी/का.प्र.
लखनऊ, उत्तरप्रदेश येथे ४७ वी जुनिअर मुलींची राष्ट्रीय पातळी हॅन्डबॉल अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी पार पाडत कांस्य पदक प्राप्त केले.
महाराष्ट्र संघात ने. हि. महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथील पायल ठाकरे, दिव्या घोरमोडे, वंशिका दुनेदार यांनी उत्कृष्ट असे प्रदर्शन करून गुजरात, पंजाब, आंध्रप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल व हरियाणा अश्या बलाढ्य संघाला हरवून महाराष्ट्र संघाला कास्यपदक मिळवून दिले
या सर्व खेळाडूंना नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैया, प्रा. जी.एन. केला, मेजर विनोद नरड संचालक कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एच. गहाणे, डॉ. एस. एम. शेकोकर उपप्राचार्य तथा शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ. एम. ए. शेख क्रीडा समिती अध्यक्ष, डॉ. के. एम. शर्मा, प्रा. आनंद भोयर पर्यवेक्षक कनिष्ठ महाविद्यालय, संजू मेश्राम यांचेसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, क्रीडा समिती मधील सर्व सदस्य, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी शुभेच्छा दिल्या. सत्कार कार्यक्रमामध्ये सर्व विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सोबतच मुख्य प्रशिक्षक सुरज मेश्राम, शुभम जंगले, सौरभ तलमले, ऋतूज मेश्राम यांचाही सत्कार करण्यात आला.