काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून योगेश मिसार यांच्या नावावर शिक्कामोर्तब
एकुण २३ पैकी २२ उमेदवार निश्चित उमेदवारांची यादी जाहीर
ब्रम्हपुरी /महेश पिलारे
ब्रम्हपुरी नगर पालिकेची निवडणूक ०२ डिसेंबरला पार पडणार आहे. १० नोव्हेंबर २०२५ पासून उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ब्रम्हपुरी नगर पालिकेच्या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेवक तथा उद्योजक डॉ. नितीन उराडे व प्रतिष्ठीत व्यापारी तथा ब्रम्हपुरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष योगेश मिसार यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाचा निश्चित उमेदवारांचा तिढा सोडविला. काँग्रेस पक्षाकडून ब्रह्मपुरी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे निश्चित उमेदवार म्हणून प्रतिष्ठीत व्यापारी तथा ब्रम्हपुरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष योगेश मिसार यांचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ब्रह्मपुरी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या नावाची जाहीर घोषणा केली. तसेच उर्वरित नगरसेवक पदाच्या उमेदवारांची निश्चीत यादी जाहीर करण्यात आली. यात एकुण २३ उमेदवारपैकी २२ निश्चीत उमेदवारांची घोषणा काँग्रेस पक्षाने केली आहे.
यात प्रभाग क्रमांक १(अ) काजल राजेश तलमले, (ब) चंद्रकांत ज्ञानेश्वर बावणकुळे,
प्रभाग क्रमांक २ (अ) बबीता किशोर आमले (ब ) प्रकाश शामराव खोब्रागडे,
प्रभाग क्रमांक ३ (अ) मनोज कावळे, (ब) रेणूताई राहुल ठेंगरी,
प्रभाग क्रमांक ४ (अ) डॉ. प्रेमलाल मेश्राम (वंचित बहुजन आघाडी), (ब) तनुजा विजय राऊत,
प्रभाग क्रमांक ५ (अ) सतिश हुमने, (ब) रंजना नंदू पिसे, प्रभाग क्रमांक ०६ (अ) लता सिंहगडे (वंचित), (ब) मोंटू पिलारे,
प्रभाग क्रमांक ७ (ब) अमोल वामनराव भानारकर,
प्रभाग क्रमांक ८ (अ) पुष्पलता सुधाकर पोपटे, ( ब ) नितीन जनार्दन उराडे,
प्रभाग क्रमांक ९ (अ) अनिल दोनाडकर, (ब) सपना संजय बल्लारपूरे,
प्रभाग क्रमांक १० (अ) राकेश पडोळे, (ब) ज्योती राऊत, प्रभाग क्रमांक ११ (अ) माधुरी सोमेश्वर उपासे, (ब) रंजना बुराडे, ( क ) हार्दिक किशोर रत्नपारखी यांचा समावेश आहे. उर्वरीत ०१ नाव लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.