एल. एम. बी. स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बारावी परीक्षेत मिळविले यश

   


ब्रम्हपुरी/का.प्र. -
    एल. एम. बी. पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यानी बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत पहिल्याच वर्षी २०२४-२०२५ घवघवीत यश संपादन केले आहे. एन. एच. एज्युकेशन सोसायटी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या विविध शाखेतून शिक्षणाचा दर्जा अधिकाधिक उंचावित आहे. याच सोसायटीच्या एल. एम. बी. पब्लिक स्कुल या शाखेने यशाची परंपरा कायम राखलेली आहे. 
यावर्षी २०२४ २०२५ या शैक्षणिक सत्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम टक्केवारीत बाजी मारून निकालात भर पाडलेली आहे. यामध्ये सोहन पंढरी पिसे या विद्यार्थ्याने ९१% प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच रूपक राजेश्वर चहांदे याने ८८% प्राप्त करून द्वितीय क्रमांक आणि स्वरा श्रीकांत कावळे ८५.२०% हिन करून तिसरा कमांक पटकाविला आहे. वर्ग १२ वीच्या विद्यार्थ्यांची ही प्रथम बॅच असून त्यांनी उत्तम निकाल देऊन शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवलेला आहे. 
यावर्षीच्या सीबीएसई १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी निकालात केलेल्या उत्तम शैक्षणिक कामगिरीबद्दल आणि त्यांनी प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव मा. अशोकजी भैया सर, संचालिका आशिता भैया मॅडम, प्राचार्य कादिर कुरेशी सर, उपमुख्याध्यापिका रश्मी राठी मॅडम, पर्यवेक्षिका रश्मी झोडे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

  Post Views:   272



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी