एलएमबी पब्लिक स्कुलच्या संचालिका आशिता भैया यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

   

ब्रम्हपुरी/का.प्र.
   येथील एल.एम.बी. पब्लिक स्कुलच्या वतीने दिनांक १२ एप्रिल२०२५ ला नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेच्या नुतन सदस्या व स्कुलच्या संचालिका आशिता भैया मॅडम यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. 
वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे संगीत शिक्षक यांच्या ँग्rूप््aब् गीताने झाली. गिताच्या माध्यातून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले गेले. कार्यक्रमप्रसंगी ने. हि. शिक्षण सस्थेचे सचिव अशोकजी भैया सर, स्कुलचे प्राचार्य कादिर कुरेशी सर, उपप्राचार्य, सुपरवाईजर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वानी आशिता भैया मॅम यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 
उत्साहापूर्ण कार्यक्रमात स्कुलच्या पर्यवेक्षिका रश्मी झोडे मॅम यांनी आपल्या काव्यातून आशिता भैया मॅडमच्या यशस्वी जीवनावर प्रकाश टाकला. यानंतर संचालिका आशिता मॅम यांनी आपले विचार व्यक्त केले. शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली हे कार्य मी यशस्वीरित्या पार पाडत आहे. व यापुढेही यशस्वी रित्या पार पाडणार. प्रत्येक कार्य करण्याकरिता मला प्रोत्साहित केले जाते असे म्हणत या संपूर्ण यशाचे श्रेय संस्थेचे सचिव अशोकजी भैया सर यांना दिले. 
कार्यक्रमाच्या शेवटी आशिता भैया मॅम यांच्या हस्ते केक कापण्यात आले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अल्पोहार घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पुजा हर्षे मॅडम यांनी केले.

  Post Views:   185



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी