लोकराजे शिवरायांचा शिवधर्म हा लोकहितासाठीच
शिवजयंती उत्सव: डॉ धनराज खानोरकर यांचे प्रतिपादन
ब्रम्हपुरी/का.प्र.
छत्रपती शिवाजीराजे हे खरे रयतेचे राजे होते. त्यांनी स्वतंत्र राज्य आपल्या बळावर निर्माण केले. ते रयतेतील प्रत्येक घटकांची नितांत काळजी घेत असत. हा राजा आपले मनातले करतो आहे, असे सार्या रयतेला वाटे. याच कारणाने रयत त्यांच्यासाठी प्राणाचे बलिदान द्यायला तयार होती कारण लोकराजे शिवरायांचा शिवधर्म हा लोकहितासाठीचा होता असे मार्मिक विवेचन कवी डॉ. धनराज खानोरकरांनी केले. ते शिवाजी जयंतीनिमित्त अर्हेर नवरगावात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
विचारपिठावर उद्घाटक म्हणून कृष्णा सहारे तर अध्यक्ष म्हणून विलास उरकुडे उपस्थित होते. यावेळी मोंटू पिलारे, डॉ. मोहन कापगते, लेखक अशोक पवारांनी मार्गदर्शन केले. प्रा.संजय मगरांनी शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी प्रबोधन विचार मांडले. बक्षिस वितरक म्हणून अॅड. हेमंत उरकुडे उपस्थित होते. जितेंद्र कर्हाडे, सतीश ठेंगरे, सुभाष ठेंगरे, ऋषी ठेंगरे, वैशाली लोखंडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. पाहूण्यांच्या हस्ते सोमेश्वर खरकाटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याशिवाय स्पर्धेतील विजयींना गौरविण्यात आले. सप्तखंजेरीवादक पंकज पाल महाराजांचा प्रबोधन कार्यक्रम रात्री पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी अमरदीप लोखंडे यांनी, संचालन विनित ठेंगरी व आभार प्रदर्शन वामन मिसार यांनी केले. यशस्वीतेसाठी संजू ढोरे, मुन्ना टेंभुरकर व शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्यांनी मोलाचे सहकार्य केले.