अज्ञात इसमाचा मृतदेह विहिरीत आढळला

   

ब्रह्मपुरी 
       ब्रह्मपुरीत अज्ञात इसमाचा मृतदेह 05 मे ला सकाळी सात वाजताच्या सुमारास विहिरीत आढळून आला. 
       शहरातील पेठ वार्ड येथील हनुमान मंदिराजवळील विहिरीत एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. सदर मृतदेह आढळून आल्यानंतर नागरिकांनी एकच बघायची गर्दी केली. सदर मृतदेह आढळून आल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना देण्यात आली. ब्रह्मपुरी पोलिसांनी सदर मृतदेह विहिरीतून काढून मृतदेहाचा पंचनामा केला. अज्ञात मृतकाच्या खिशात पोलिसांना एक डायरी सापडली आहे. त्याच्या आधारे चौकशी केली असता, मृतकाचे नाव तिलक बाबुराव कुमरे राहणार बंगाली कॅम्प चंद्रपूर असे असल्याचे कळते. सदर इसम हा ब्रह्मपुरी परिसरात भटकत असल्याचे कळते. ब्रह्मपुरी पोलिसांनी सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठवला आहे. ब्रह्मपुरी पोलिसांनी सदर मृतकाच्या कुटुंबियांना माहिती कळविली असून वृत्त लिहेपर्यंत ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

  Post Views:   775



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी