अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

ब्रम्हपुरी तालुक्यातील सोंदरी येथील घटना, आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी
   

ब्रह्मपुरी 
           १३ वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आरोपी हा सोंदरी येथील रहिवासी असून त्याचेविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ६४/(२) (M), ६४/(२F), ६५ (1), दिव्यांग अधिकार अधिनियम कलम ९२ (ड) तथा पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
           माणूसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेने दिव्यांगाच्या तथा मतिमंद महिलेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतिमंद मुलगी समाजात सुरक्षित नसेल तर ही समाजाकरीता लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.
            पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार पिडीत अल्पवयीन मतिमंद मुलगी ही वडसा येथील मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेत शिकत आहे. स्वगावी असतांना आरोपी तिच्या मागावर असायचा. आरोपीने मागील दीड वर्षापासून पिडीतेवर लैंगिक अत्याचार केला. यातून ती गर्भवती असल्याची बाब वैद्यकीय तपासणीतून समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शीतल खोब्रागडे करीत आहे.

  Post Views:   955




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी