‘जय श्रीराम’च्या घोषाने नागभीड नगरी दुमदुमली

आम. बंटी भांगडिया, मेघा भांगडिया, अपर्णा भांगडिया यांची शोभयात्रेला भेट
   



नागभीड/प्रतिनिधी
श्रीराम नवमी उत्सव समिती नागभीड च्या वतीने चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी  भांगडिया यांच्या मार्गदर्शनात रामनवमीला भव्य अशी शोभा यात्रा नागभीड शहारातून काढण्यात आली. 
मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे रीतसर पूजन करण्यात आले. त्यानंतर शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. सर्वात समोर ढोल ताशा पथक, प्रभू श्रीरामाची भव्य असे सुशोभीत छायाचित्र, घोड्यावर स्वार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता यांची रथावर आकर्षक झाकी, नवदुर्गा झाकी, प्रभू श्रीराम यांच्या जन्मावर आधारित झाकी व इतर झाक्या, आकर्षक लायटिंग, फटाक्यांची आतिषबाजी यामुळे शोभा यात्रेला भव्यता आली. 
या शोभा यात्रेत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडून आले. नागभीड मुस्लिम समाज व एकता मुस्लिम युवा ग्रुप च्या वतीने शोभा यात्रेत सहभागी राम भक्तांना शरबत चे वितरण करण्यात आले तर विविध ठिकाणी मुस्लिम बांधवाकडून फुलांची उधळण श्रीराम, लक्ष्मण माता सीता यांच्या रथावर करण्यात आली. स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वतीने रामभक्तांना लाडू, काबरा परिवाराच्या वतीने थंड पेय, स्वा.सावरकर चौकात सुधाकर बोरकर व मित्र परिवारच्या वतीने दूध वितरण करण्यात आले. शोभा यात्रेला नागभीड व नगर परिषद क्षेत्रातील जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. सदर शोभायात्रेत महिलांची लक्षनीय उपस्थिती होती. सर्वं महिला  जय जय श्रीराम च्या घोषणा देत होत्या. बाल, युवा, प्रौढ सर्व एक हृदयाने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. सदर शोभा यात्रेच्या प्रसंगी श्री रामनवमी उत्सव समितीचे मार्गदर्शक तथा आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी भेट दिली व प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. सोबतच मेघा भांगडिया, अपर्णाताई भांगडिया यांनी सुद्धा भेट देत महिलामध्ये सहभागी झाल्या.

  Post Views:   28



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी