एचएससी परिक्षेत ने.हि. महाविद्यालयाची सिध्दी पटेल जिल्ह्यात प्रथम

ब्रम्हपुरी शिक्षणाचे माहेरघर असल्याचा पुन्हा एकदा प्रत्यय; तालुक्याचा निकाल ९१.२८ टक्के
   

ब्रम्हपुरी/महेश पिलारे
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल राज्यमंडळाने सोमवारला दुपारी ०१ वाजता ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर जाहीर केला. यात पूर्व विदर्भात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या ब्रम्हपुरी शहरातील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाची वाणिज्य विभागाची विद्यार्थीनी सिद्धी अशोक पटेल हिने ९७.१७ टक्के गुण संपादित करीत तालुक्यात व जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच स्मिता लोमेश तोंडरे ह्या विद्यार्थीनीने ९२.६७ टक्के द्वितीय तर ओम प्रशांत बल्लेवार याने ९०.१७ टक्के गुण प्राप्त करून तृतीय स्थान मिळविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची अनुष्का विनोद मेश्राम हिने ८८.६७ टक्के गुण प्राप्त करीत विज्ञान शाखेतून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विद्यार्थीनी रूतूजा जीवनदास भरडे हिने ८५.५० टक्के गुण संपादित करून कला शाखेतून तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. नेत्रदिपक शैक्षणिक कामगिरीबद्दल नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया तसेच ने.हि. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
ब्रम्हपुरी तालुक्यातील २२३२ विद्यार्थ्यांपैकी २२३२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी २०३२ विद्यार्थी इयत्ता १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झाले असून यात प्राविण्य श्रेणीमध्ये ५७ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये ३०४ तर द्वितीय श्रेणीमध्ये १०५२ व पास श्रेणीमध्ये ६१९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ब्रम्हपुरी तालुक्याचा इयत्ता १२ वी चा निकाल ९१.२८ टक्के इतका लागला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातून ख्रिस्तानंद ज्यु. कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.
 ब्रम्हपुरी तालुक्यातील महाविद्यालय निहाय निकाल -ने.हि. महाविद्यालय ब्रम्हपुरी विज्ञान शाखा-९९.५४ टक्के, कला शाखा९६.४७ टक्के, वाणिज्य शाखा-९५.२९ टक्के, एकुण निकाल- ९७.९५ टक्के, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रम्हपुरी विज्ञान शाखा-९७.०५ टक्के, कला शाखा- ८१.८१टक्के, वाणिज्य शाखा-९३.०२टक्के एकुण निकाल-९१.९४ टक्के, लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी विज्ञान शाखा-१००टक्के, कला शाखा-९२.४२ टक्के, एकुण निकाल- ९६.४० टक्के, नेवजाबाई हितकारिणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी कला शाखा- ९१.६६ टक्के, एकुण निकाल- ९१.६६ टक्के, कृषक ज्यु. कॉलेज चौगान विज्ञान शाखा- ९८.३३ टक्के, कला शाखा- ७४ टक्के, एकुण निकाल- ८३.१२ टक्के, ज्ञानोपासक ज्यु. कॉलेज निलज कला शाखा-८९.४७ टक्के, एकुण निकाल-८९.४७ टक्के, लोक ज्यु. कॉलेज गांगलवाडी कला शाखा- ६७.०१ टक्के एकुण निकाल- ६७.०१ टक्के, डॉ. पंजाबराव देशमुख कन्या ज्यु. कॉलेज कला शाखा- ६८ टक्के, एकुण निकाल - ६८ टक्के, महात्मा फुले ज्यु. कॉलेज मेंडकी - कला शाखा- ७५ टक्के, एकुण निकाल- ७५ टक्के, कर्मवीर कला क. महाविद्यालय, मुडझा कला शाखा-९२.६ टक्के, एकुण निकाल-९२.६ टक्के, कर्मवीर कन्नमवार क. महाविद्यालय सुरबोडी कला शाखा-८२.५ टक्के, एकुण निकाल-८२.०५ टक्के, ख्रिस्तानंद कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी - विज्ञान शाखा-१०० टक्के, एकुण निकाल- १०० टक्के, अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरी विज्ञान शाखा-९७.२९ टक्के, कला शाखा-९१.८९टक्के, एकुण निकाल-९४.५९ टक्के, मारोतराव बन्सोड ज्यु. कॉलेज खेडमक्ता - कला शाखा-४२.१० टक्के, एकुण निकाल-४२.१० टक्के, ने.हि. ज्युनिअर कॉलेज एम.सी.व्हि.सी. शाखा ८२.६० टक्के, एकुण निकाल ८२.६० टक्के इतका तालुका निहाय निकाल लागला आहे.

  Post Views:   86



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी