एन.एम.एम.एस. परीक्षेत नेवजाबाई हितकारिणी विद्यालयाचे घवघवीत यश

यशस्वी ४१ विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार
   

ब्रह्मपुरी
       नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रह्मपुरी येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून तब्बल ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही यशस्वी कामगिरी शाळेच्या शैक्षणिक परंपरेला साजेशी व प्रेरणादायी ठरली आहे.
      या यशानिमित्त शाळेत यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक श्री नाईक सर यांच्या उत्कृष्ट नियोजनबद्ध आखणीमुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळवता आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक ए. डब्लू. नाकाडे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थी व पालकांना सखोल व अनुभव संपन्न असे मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक पी. आर. जिभकाटे उपस्थित होते. तसेच जेष्ठ शिक्षक वदनलवार सर आणि श्री रतीराम चौधरी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 ब्रह्मपुरी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
             मार्गदर्शनपर भाषणात श्री चौधरी सर यांनी NMMS परीक्षा ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक बळ देणारी असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे असे नमूद केले. आदरणीय धांडे सर यांनी एन एम एस परीक्षेची इत्यंभूत माहिती देऊन पुढे कोणती कागदपत्रे व अटींची पूर्तता करावी लागेल याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत तसेच शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
           या परीक्षेच्या तयारीसाठी स्कॉलरशिप प्रमुख म्हणून अनुराग देशमुख सर यांनी विशेष जबाबदारी सांभाळली. त्यांना नीता महाजन मॅडम, विलास करंबे सर, शिवानी कुथे मॅडम, माया कापगते मॅडम व कलकोटवार मॅडम यांनी सहकार्य करून विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध व सखोल मार्गदर्शन केले.
         कार्यक्रमाचे संचालन नीता महाजन मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन माया कापगते मॅडम यांनी केले. सर्व शिक्षकांचे योग्य असे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी संस्थेचे सचिव श्रीमान अशोकजी भैया तसेच संस्थेचे इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे त्याचप्रमाणे विद्यालयातील संपूर्ण शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यास मदत केली. विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्वत्र मनःपूर्वक कौतुक केले जात आहे.

  Post Views:   11




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी