एलएमबी स्कुलच्या विद्यार्थ्यांचे आयएसओ परिक्षेमध्ये प्राविण्य

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
 सायन्स ऑलीम्पीआड मार्फत घेण्यात आलेल्या International Social Study Olympiad मध्ये एल.एम.बी. स्कुलच्या १८ विद्यार्थ्यांनी Gold Madel (सूवर्ण पदक) प्राप्त केले. 
 आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धाना समोर जावे लागते. केवळ बुध्दीच्या बळावर आपण आपले लक्ष्य साध्य केले पाहिजे, या करीता एल.एम.बी. पब्लिक स्कुल विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासावर भर देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशिल असते. International S.S.T. Olympiad Exam मध्ये वर्ग ३ ते १० वी पर्यतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून १७ विद्यार्थ्यानी सूवर्ण पदक (Gold Madel) प्राप्त कले. 
 विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशानिमित्य शाळेच्या संचालिका आशिता भैया मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देवून गौरव केला. तसेच पुढील स्पर्धेकरीता स्कुलचे अध्यक्ष तथा नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैया सर, स्कुलच्या संचालिका आशिता भैया मॅडम, मुख्याध्यापक कादिर कुरेशी, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

  Post Views:   24



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी