वैकुंठ टेंभुर्णे, फाल्गुन मेश्राम यांचा सेवानिवृत्ती सत्कार

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
तोरगाव केंद्राअंतर्गत बेलगाव जाणी येथील उपक्रमशील शिक्षक वैकुंठ टेंभुर्णे व तोरगाव येथील संयमी शिक्षक फाल्गुन मेश्राम व नान्होरी येथील पुरुषोत्तम नागमोती यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा भावपूर्ण सत्कार व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन तोरगाव केंद्रातील सर्व शिक्षक यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णूजी रुईकर, प्रमुख अतिथी म्हणून लिंकेश्वर अवसरे, रामटेके, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, स्थानिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर मडावी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुरलीधर खोब्रागडे, सचिन परशुरामकर, मंगाम मॅडम यांनी सेवानिवृत्त शिक्षकांना शुभेच्छा देत त्यांच्याबद्दलच्या आठवणी व्यक्त केल्या. शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाची प्रशंसा सर्वांनी केली. प्रसंगी सत्कारमुर्तींना ड्रेस, शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू व साळी देऊन त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. भाविक सुखदेवे यांनी गीत व भाषणांच्या माध्यमातून आपल्या शिक्षकावरील प्रेम व्यक्त केले.

  Post Views:   96



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी