एलएमबी पब्लिक स्कुलमध्ये ग्रीष्मकालीन शिबीराचे उद्घाटन

   


ब्रम्हपुरी/का. प्र. 
 शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या ब्रम्हपुरी शहरातील नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेतील एक शाखा म्हणजेच एल.एम.बी. पब्लिक स्कूल हे नामांकित विद्यालय होय. या विद्यालयामार्फत वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. तीच परंपरा कायम राखीत ०२ मे २०२५ ते ०८ मे २०२५ या कालावधीसाठी ग्रीष्मकालीन शिबिराचे Summer Camp चे आयोजन करण्यात आले. 
 या शिबिरात मुलांसाठी विविध मनोरंजक आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. या उन्हाळी शिबिरांमुळे मुलांना नवनविन गोष्टी शिकायला मिळतात. प्रशिक्षण शिबिरातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होते. मुलांमधील सृजनशक्ती व कलात्मक वृत्तीचा विकास व्हावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. नवीन गोष्टी आत्मसात करण्याची, शिकण्याची वृत्ती व आवड, कौशल्य विकास वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या ग्रीष्मकालीन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छाकार्ड, Clay Models, Swan Making Activity, Pen Stand, Bird Feader, Resin Art, Dream Catcher इ. उपक्रम घेत आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना नृत्यशिक्षण, योग व ध्यानधारणाही शिकविण्यात येत आहे. 
 सोबतच विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी विविध indoor व Outdoor Fun Games चे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती वाढावी. वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत व्हावा यासाठी indoor Science Activity चे आयोजन केले आहे. मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी त्यांना भोजनाचे महत्त्व व त्याबाबत योग्य सवयी शिकविण्यात येतील. त्याचबरोबर व्यक्तीमत्व विकास शिबिराचे देखील आयोजन केले आहे. 
 या शिबिराचे उद्घाटन स्कुलच्या संचालिका अशिता भैया मॅडम यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी एल. एम. बी. पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक कादिर कुरेशी सर, उपमुख्याध्यापिका रश्मी राठी मॅडम, पर्यवेक्षिका रश्मी झोडे मॅडम, समस्त शिक्षकवृंद व कर्मचारीगण उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला खेवले मॅडम व श्यामली मेने मॅडम यांनी केले.

  Post Views:   176



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी