तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत २३एप्रिल ला

   

ब्रह्मपुरी-ब्रम्हपुरी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्गातील महीलाकरीता सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत दिनांक २३/०४/२०२५ ला दुपारी ०२.०० वाजता तहसील कार्यालय, ब्रम्हपुरी (नविन प्रशासकिय इमारत, पहिला माळा) येथे तहसीलदार, ब्रम्हपुरी यांचे अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात येणार आहे. तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण पुढील ५ वर्षाच्या कालावधीसाठी आरक्षण निश्चीत करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. करीता या सभेसाठी सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन तहसीलदार सतीश मासाळ यांनी केले आहे.

  Post Views:   73



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी