ने. हि. शिक्षण संस्थेच्या वतीने स्व. मदनगोपालजी भैया यांच्या पुण्यतिथी निमित्त आज कार्यक्रमाचे आयोजन

   

ब्रह्मपुरी 
        ब्रह्मपुरी तालुक्यातील भटक्या, विमुक्त, मागास, आदिवासी आणि वंचित घटकांचा शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीन विकास व्हावा म्हणून, शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी ब्रह्मलीन संस्थापक स्वर्गीय मदनगोपालजी भैया यांनी नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निस्सीम गुरुदेव भक्त कर्मयोगी स्वर्गीय मदनगोपालची भैय्या यांची आज पुण्यतिथी. नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेच्या वतीने ब्रह्मलीन संस्थापक स्वर्गीय मदनगोपालची भैय्या यांच्या पुण्यतिथी निमित्त स्थानिक एल. एम. बी. पब्लिक स्कूल ब्रह्मपुरी येथे आज दिनांक ०७ मे २०२५ बुधवारला सायंकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  Post Views:   92



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी