ब्रम्हपुरी तालुक्याचा १२ वीचा निकाल ८७.३७ टक्के; ख्रिस्तानंद आणि नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयांची उत्तुंग भरारी!
ब्रम्हपुरी:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला. या निकालात ब्रम्हपुरी तालुक्याने चमकदार कामगिरी केली असून, तालुक्याचा एकूण निकाल ८७.३७ टक्के लागला आहे. तालुक्यातील अनेक नामांकित महाविद्यालयांनी ९० टक्क्यांहून अधिक निकालाची नोंद करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावर्षी ब्रम्हपुरी तालुक्यातील एकूण २,२८४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी २,२७४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १,९८७ असून प्राविण्य श्रेणी (Distinction): ६१ विद्यार्थी,प्रथम श्रेणी (First Class): २७६ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी (Second Class): ९९७ विद्यार्थी, पास श्रेणी: ६५३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.तालुक्यातील विविध महाविद्यालयांच्या निकालात मोठी तफावत दिसून आली आहे. काही महाविद्यालयांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली, तर काही ठिकाणी निकालाची घसरण पाहायला मिळाली. ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेज९८.४८%, नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी९८.२५%, लोकमान्य टिळक ज्युनिअर कॉलेज ९६.८३%, अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळा ९२.८५%, ने. हि. उच्च माध्यमिक विद्यालय ९०.००%, ने. हि. महाविद्यालय (MCVC)८६.७९%, लोक ज्युनिअर कॉलेज, गांगलवाडी८६.३१%, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ८३.६०%, महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज, मेंडकी ७७.७७%, कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालय७७.१४%, ज्ञानोपासक ज्युनिअर कॉलेज, निलज ६५.००%, कृषक ज्युनिअर कॉलेज, चौगान ६४.७७%, कर्मवीर कन्नमवार कनिष्ठ महाविद्यालय, सुरबोडी ६०.००%, डॉ. पंजाबराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय ५९.३७% व मारोतराव बन्सोड ज्युनिअर कॉलेज, खेडमक्ता २८.५७% यांचा समावेश आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी सायबर कॅफे आणि मोबाईलवर आपला निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.