वन नेशन, वन इलेक्शन परिषदेत ब्रम्हपुरीच्या तनय देशकर यांचा सहभाग

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
 नुकताच भारत सरकारच्या वतीने वक्फ बिलात मोठे बदल करण्यात आले. सरकारचे पुढचे उद्दिष्ट वन नेशन, वन इलेक्शन चे आहे. संपूर्ण देशात एकाच वेळी पंचायत ते लोकसभा निवडणुका घेण्याचा सरकारचा मानस आहे. देशात विविध वेळी अनेक ठिकाणी निवडणुका पार पडतात. यामध्ये सरकार चा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या काळात आचार संहिता लागू असल्याने सर्व विकास कामे ठप्प पडतात. अधिकारी वर्ग सतत निवडणुकीच्या कामात व्यस्त असतो. यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. देशात ‘एक देश, एक निवडणूक’ कायदा लागू झाल्यास निवडणूकांवरील खर्च सरकारला कमी करता येऊ शकतो सोबतच विकास कामे जलद गतीने पूर्ण होऊ शकतात. 
 वन नेशन वन इलेक्शन च्या दृष्टीने सरकारने मागील काळात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. देशाचे गृह मंत्री अमित शाह या समितीचे उपाध्यक्ष असून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा या समितीत समावेश आहे. या समितीच्या वतीने २३ एप्रिल २०२५ रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनेशनल सेंटर येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय युवा परिषदेत संपूर्ण देशातून निवडक युवा प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. या मध्ये महाराष्ट्र राज्याच्या वतीने ब्रह्मपुरी येथील तनय देशकर यांना राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तनय देशकर हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्ह्याचे सरचिटणीस असून युवा उद्योजक आहेत. मागील काही वर्षांपासून ते ब्रह्मपुरी येथील सक्रिय राजकारणात व समाजकारणात कार्यरत आहेत. 
 नवी दिल्ली येथे आयोजित वन नेशन, वन इलेक्शन ची राष्ट्रीय युवा परिषद भारत सरकारचे कृषी मंत्री तथा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तर विविध मुद्यांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यासाठी भारत सरकारचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व भारत सरकारचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय प्रामुख्याने पूर्णवेळ या परिषदेला उपस्थित होते. नवी दिल्ली येथे आयोजित या परिषदेतील सहभागाबद्दल तनय देशकर यांचे सर्व स्तरावर अभिनंदन केले जाते आहे.

  Post Views:   35



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी