ब्रम्हपुरी येथे महिला व बाल रूग्णालयाला मंजूरी मिळणार

सार्व. आरोग्य मंत्र्यांची विधानसभेत ग्वाही
   

ब्रम्हपुरी/का.प्र.
ब्रम्हपुरी येथे नवीन महिला व बाल रुग्णालय धोरणानुसार प्रस्तावित आहे. हे रुग्णालय मंजूर करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. 
याबाबत सदस्य समीर कुणावार यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी योगेश सागर, विक्रम पाचपुते, बाळा नर यांनी उपप्रश्न उपस्थित केला. मंत्री आबिटकर म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी प्रस्तावित बाल रुग्णालय आणि श्रीगोंदा शहरात १०० खाटांचे रुग्णालय यासंदर्भात आराखडा तयार असून, हा विषय प्राधान्याने सोडविण्यात येणार आहे.

  Post Views:   41



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी