ब्रह्मपुरी येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती गोदावरीदेवी मोहता यांचे दुःखद निधन

   

ब्रह्मपुरी:
             ब्रह्मपुरी येथील मोहता कुटुंबातील ज्येष्ठ सदस्या आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्रीमती गोदावरीदेवी मोहता यांचे आज बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मोहता परिवारावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
         श्रीमती गोदावरीदेवी मोहता या ब्रह्मपुरीतील नामवंत उद्योजक श्याम सुंदर मोहता आणि दुर्गा दास मोहता यांच्या मातोश्री होत. प्रेमळ आणि सुसंस्कारी व्यक्तिमत्व म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्या कमलेश, तुषार, निलेश, लक्ष्मीकांत, नीरज आणि सूरज मोहता यांच्या आजी होत.
       त्यांची अंतिम यात्रा आजच बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी, दुपारी १:०० वाजता काढण्यात येणार आहे. चांदगाव रोड येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानावरून ही अंत्ययात्रा निघणार असून, स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

  Post Views:   228




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी