ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते मारोतराव कांबळे काळाच्या पडद्याआड

   


ब्रह्मपुरी
       विदर्भातील आंबेडकरवादी चळवळीचे नेते मारोतरावजी कांबळे यांचे मंगळवार ला २३ सप्टेंबर २०२५ ला सायंकाळी सात वाजता नागपूर येथील किंग्स वे हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते.
       मारोतरावजी कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यासोबत सन १९७२ मध्ये ब्रह्मपुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयाची स्थापना केली. मारोतरावजी कांबळे हे ब्रह्मपुरी येथील आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. संपूर्ण विदर्भात शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागळा पर्यंत पोचविण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. शोषित, वंचित ,पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचं कार्य त्यांनी अविरत केले.
    त्यांच्या जाण्याने रिपब्लिकन पक्षाची फार मोठी हानी झाली आहे.ब्रह्मपुरी परिसरात एक सांस्कृतिक, सामाजिक, राजकिय आणि शैक्षणिक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली असून ही पोकळी कधी न भरुन निघणारी आहे. त्यांच्या मागे मुलगा प्राचार्य डॉ देवेश कांबळे, डॉ राजेश कांबळे, मुलीं, नातवंडे व बराच मोठा मित्रपरिवार आहे.
त्यांना अर्धसाप्ताहिक ब्रह्मपुरी समाचार परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

  Post Views:   951




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी