मंगेश गोवर्धन यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार

   


ब्रह्मपुरी/का. प्र.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द व बेलगाव जाणी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश विजय गोवर्धन यांना सन २०२३-२०२४ चा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. 
महाराष्ट्र राज्य शासनातर्पेâ जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ट काम करणार्या  ग्रामपंचायत अधिकारी यांना शासन स्तरावरून यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. नागपूर विभागातून, चंद्रपूर जिल्ह्यातून मंगेश विजय गोवर्धन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद स्तरावर अतिउत्कृष्ट काम करणार्याप ग्रामपंचायत अधिकारी यांना शासनाच्या स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार सन  २०२३-२४ या वर्षाकरिता आदर्श ग्रामपंचायत अधिकारी यांची निवड शासनाकडून जाहीर कण्यात आली आहे.  ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

  Post Views:   63



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी