तो नरभक्षक वाघ अखेर जेरबंद
- ब्रह्मपुरी वन विभागाचे यश
ब्रह्मपुरी - ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा येथील रहिवासी विनायक विठोबा जांभुळे वय वर्षे 60 हे मोहाफुले गोळा करीत असतांना त्यांचेवर वाघाने अचानक हल्ला करुन त्यांना ठार केले होते. यापूर्वी सुद्धा एका व्यक्तीला नरभक्षक वाघाने ठार केल्याच्या व दोन व्यक्तींना जखमी केल्याची घटना घडली होती. सदर भागात मानव वन्यजीव संघर्ष शिगला पेटला होता. त्यामुळे परत मानव व वन्यजीव संघर्ष उद्भवू नये याकरीता T-3 वाघाला जेरबंद करणे आवश्यक असल्याने, दिनांक 17.04.2025 रोजी उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र मॅडकी नियतक्षेत्र चिचखेडा मधील कक्ष क्रमांक 152 मध्ये पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डॉट तयार करुन अजय सी. मराठे पोलीस हवालदार निशानेबाज यांनी T-3 वाघाला अचूक निशाणा लावून दुपारी 12.15 वाजता डॉट मारुन वाघाला बेशुध्द केले. नरभक्षक बेशुद्ध वाघाला जेरबंद करण्यांत आले.
सदर कार्यवाही सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे व वन्य) ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी महेश चोपडे, तथा निम्नस्वाक्षरीकते सचिन नरड वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर ब्रम्हपुरी यांचेसह उपक्षेत्र मेंडकी, नवेगांव येथील क्षेत्रीय वनकर्मचारी तसेच डॉ. रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकिय अधिकारी RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, श्री अजय मराठे पोलीस हवालदार (शुटर), विकास ताजणे, योगेश लडके, प्रफुल वाटगूरे, गुनणक धोरे, दिपेश टेंभुर्णे, वसीम शेख, अमोल कोरपे, जय सहारे, अक्षय दांडेकर, अभिषेक चांदेकर, राकेश आहुजा (बॉयोलाजिस्ट) यांचे उपस्थितीत पार पडली. जेरबंद करण्यांत आलेल्या 1-3 (नर) वाघाचे वय अंदाजे 15 वर्षे असून त्याला गोरेवाडा रेस्कु सेन्टर नागपूर येथे स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे वन विभागाने कळविले आहे.