एलएमबी पब्लिक स्कुलच्या वतीने अशोक भैया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
ब्रम्हपुरी/का. प्र.
एल. एम. बी. पब्लिक स्कुल ब्रम्हपुरीच्या वतीने नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव मा. अशोकजी भैया सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती स्नेहलता भैया मॅडम, अशोकजी भैया सर, सौ. सुनिता भैया मॅडम, गौरवजी भैया सर, संचालिका अशिता भैया मॅडम, जतिन राठी सर, रूचिता राठी मॅडम संपूर्ण परिवार उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक कादिर कुरेशी सर, उपमुख्याध्यापिका रश्मी राठी मॅडम, पर्यवेक्षिका रश्मी झोडे मॅडम, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
मा. अशोकजी भैया सर यांची प्रशासक, कला-कुशल, निपूण व्यक्तिमत्व, यशस्वी राजकीय नेता, सफल उद्योगपती, शिक्षण महर्षी तसेच उदार व्यक्तिमत्वाचे धनी अशी ख्याती आहे. शिक्षणाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडण्यार्या स्व. मदनगोपालजी भैया यांचा वारसा त्यांना लाभला आहे. त्यांचा वारसा पुढे चालवित अशोकजी भैया सर यांनी संस्थेला यशोशिखरावर पोहचविले. याच संस्थेची शाखा एल. एम. बी. पब्लिक स्कूलमध्ये त्यांच्या अभूतपूर्व शैक्षणिक योगदानाचे ऋण फेडण्यासाठी त्यांचा जन्मदिवस सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी यांचे औक्षवण करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व भेटवस्तू देण्यात आली.
या प्रसंगी मा. अशोकजी भैया सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे सौ. सुनिता भैया मॅडम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मा. अशोकजी भैया सर यांच्या चेहर्यावर आनंद स्पष्ट दिसून येत होता.
स्कुलचे प्राचार्य श्री. कादिर कुरेशी सर यांनी अशोकजी भैया सर यांच्या वाढदिवसा निमित्य आवडत्या गायकाचे गीत गाऊन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दानिश शेख सर यांनी केले. अशा प्रकारे मा. अशोकजी भैया सर यांचा ६४ वा वाढदिवस साजरा करून भोजनाचा आस्वाद घेण्यात आला.