ने. हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,ब्रम्हपुरीचे लक्ष्मण मेश्राम यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत दैदीप्यमान यश

व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धेत चमकदार कामगिरी
   

ब्रम्हपुरी:-
            राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERTM), पुणे द्वारा शिक्षणक्षेत्राशी संबंधित शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांचेतील कौशल्य व नवकल्पना विकसित करण्याच्या उद्देशाने सत्र 2025-26 पासून 'शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा' चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई द्वारा घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धे'त नेवजाबाई हितकारिणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथील सहा. शिक्षक लक्ष्मण गोविंदा मेश्राम यांनी आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने राज्यातील दहा उत्कृष्ट शिक्षकांमध्ये स्थान मिळवले आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे पारितोषिक विजेते होण्याचा बहुमान प्राप्त केला.

           राज्यस्तरीय 'व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धा' यात लक्ष्मण गोविंदा मेश्राम यांनी ' दहावी/बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी' हा महत्वाचा विषय हाती घेतांना राज्य मंडळाच्या आठ विभागातील शिक्षक स्पर्धकांमध्ये आपल्या अभ्यासपूर्ण, नियोजनबद्ध व उत्कृष्ट सादरीकरण कौशल्याने यशस्वी झेप घेत विद्यालयाचे, जिल्ह्याचे व विभागाचे नाव राज्यात उंचावले.

          विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे सातत्याने मार्गदर्शन करणारे स्पर्धा परीक्षेचे जाणकार व्यक्तिमत्व लक्ष्मण मेश्राम हे विद्यालयातील अधिकारी वर्गाच्या पाठिंब्यामुळे व सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन कार्यक्रम विद्यालयात आयोजित करित असतात.लक्ष्मण मेश्राम यांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवले आहे.अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शासकीय नौकरी मधे रुजू झाले आहेत.

              लक्ष्मण मेश्राम यांचे राज्यस्तरीय स्पर्धेतील यशाबद्दल ने. भै. हि. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताबाई भैया, सचिव अशोकजी भैया, सहसचिव ॲड. भास्करराव उराडे, सदस्य प्रा. सुभाषजी बजाज, सदस्य गौरवजी भैया व संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य के. एम. नाईक, उपप्राचार्य ए. डब्ल्यू. नाकाडे, पर्यवेक्षक प्रा. पी. आर. जीभकाटे तथा शिक्षकवृंद व प्रशासकीय कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

  Post Views:   71




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी