नेवजाबाई हितकारिणी कनिष्ठ महाविद्यालयात मोफत बस पासचे वितरण
ब्रह्मपुरी, दि. 28 जुलै 2026 :
नेवजाबाई हितकारिणी कनिष्ठ महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे अहिल्याबाई होळकर व मानव विकास योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोफत बस पास वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. एस. एन. शेकोकर हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आनंद भोयर तसेच मेजर विनोद नरड हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. एन. शेकोकर यांनी मोफत बस पास योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी नियमितपणे महाविद्यालयात येणे सोयीचे होईल आणि त्यांच्या शिक्षणाकडे असलेला कल अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कोमलकांत ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूनम सौंदरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रियंका उईके यांनी मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.