डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने समता रॅली उत्साहात संपन्न
ब्रम्हपुरी/का.प्र.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतिने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त बाईक व कार रॅली काढण्यात आली.
ब्रम्हपुरी नगरपरिषद क्षेत्रातील त्रिरत्न बुध्द विहार, सम्राट अशोक चौक, गुजरी वार्ड, पेठवार्ड, देलनवाडी, धम्मभूमी, बोंडेगाव, कुर्झा, वाल्मिक नगर येथील बुध्द विहारांना भेटी देत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याना रॅलीद्वारा समितीचे अध्यक्ष व रिपाई नेते अशोक रामटेके यांचे नेतृत्वात अभिवादन करण्यात आले. रॅलीत बहुसंख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना अशोक रामटेके यांनी संबोधित करून आभार मानले. त्यानंतर सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
रॅली यशस्वी करण्यासाठी समितीचे उपाध्यक्ष सुधीर अलोने, सचिव डॉ.युवराज मेश्राम, सहसचिव सुधाकर पोपटे, कोषाध्यक्ष के.जी.खोब्रागडे, संघटक नेताजी मेश्राम, महिला संघटक छाया जांभूळे यांच्यासह आसाराम बोदेले, जगदीश मेश्राम, बौद्धरक्षक जांभूळकर, डी.एम.रामटेके, दिनेश लोखंडे, नरेंद्र बांते, आनंद गणवीर, राजू मेश्राम, सरीताताई खोब्रागडे, मंगला फुले इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.