ने.भै.हि. शिक्षण संस्थेच्या १५० कर्मचार्यां नी केली नेत्र तपासणी

नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात नेत्र तपासणी शिबीर
   


ब्रह्मपुरी/का.प्र.
येथील नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था द्वारा संचालित नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी तथा अशोक नेत्रालय, ब्रम्हपुरीच्या संयुक्त विद्यमाने नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील स्व.हिरालालजी भैया सभागृहात नुकताच निशुल्क नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आला. 
नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती स्नेहलताबाई भैया, संस्थेचे सचिव अशोक भैया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एच. गहाणे, उपप्राचार्य डॉ.एस.एम.शेकोकर, शांताबाई भैया महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एस. वरभे, ने.हि.उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कपूर नाईक सर, निखारे सर, उपमुख्याध्यापक अनिल नाकाडे तथा नेत्र तपासणीसाठी उपस्थित डॉ. रोहिणी कवठे संचालक अशोक नेत्रालय ब्रम्हपुरी, स्नेहल कवठे व त्यांची चमू इत्यादी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर डोळयांची निगा कशी राखायची? डोळयात बिघाड झाल्यास कोणती उपाययोजना करायची? संगणक व मोबाईलचा नेत्रावर झालेला परिणाम यावर मान्यवर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. 
उपस्थित सर्व कर्मचा-यांच्या नेत्र तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आले. यात नेत्र तपासणीसाठी ने. हि.महाविद्यालय, शांताबाई भैया महिला महाविद्यालय, ब्रम्हपुरी, ने. हि. मुलांची शाळा, ने. हि. कन्या विद्यालय व एल. एम. बी. पब्लिक स्कूल, येथील प्राध्यापकवृंद, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी भाग घेत १५० जणांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली.
कार्यक्रमाचे संचालन उपप्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. धनराज खानोरकर यांनी केले. या शिबिरासाठी नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था कर्मचारी व अशोक नेत्रालयातील चमूने मोलाचे सहकार्य केले.

  Post Views:   85



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी