अचानक आलेल्या वादळाने ट्रॅफिक लाईट व झाड कोसळले

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
ब्रम्हपुरी शहरात उन्हाचा पारा चढत असतांना काल, बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान अचानक वादळी वार्‍याला सुरूवात झाली. अचानक आलेल्या वादळी वार्‍यामुळे शहरातील मुख्य चौकात उभे असलेले झाड उन्मळून कोसळले. तर, शहरातील मुख्य चौकात ट्राफिक सिग्नल वरील लाईट खाली कोसळल्याची घटना घडली.
शहरात बुधवारच्या संध्याकाळी अचानक वादळी वार्‍याला सुरूवात झाली. यात जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या वादळाच्या तडाख्यात शहरातील झाँसी राणी चौक येथील रस्त्याच्या लगत असलेले कंरजीचे झाड उखडून विजेच्या तारांवर कोसळले. यामुळे विजेच्या तारा तुटल्यामुळे विजेच्या तारांचे अतोनात नुकसान झाले, विद्युत प्रवाह खंडीत झाला होता. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. तर दुसर्‍या घटनेत शहरातील ख्रिस्तानंद चौकात वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी लावण्यात आलेले ट्राफिक सिग्नलवरील लाईट खाली कोसळले. तर काही खांबावरील लाईट लोंबकळत असल्याचे घटनास्थळी दिसून येत आहे. पहिल्याच वादळात ट्राफिक सिग्नलचे लाईट कोसळणे हे ट्राफिक सिग्नल लावणार्‍या कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणाचे प्रत्यक्ष उदाहरण असल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.

  Post Views:   49



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी