अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर ब्रह्मपुरी पोलिसांची कारवाई

   

ब्रह्मपुरी :
           ब्रह्मपुरी तालुक्यात अवैध धंद्यांना उत आला आहे. तालुक्यात जुगार, सट्टा, चोरी, अवैध उत्खनन व तस्करी यांसारख्या गुन्ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. ब्रह्मपुरी पोलिसांची या अवैध व्यावसायिकांवर करडी नजर असून, यावर अंकुश लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
            ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव नदी घाटातून अवैध रेती उत्खनन करून तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर ब्रह्मपुरी पोलिसांनी १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास कारवाई केली.
           प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार प्रशांत देरकर व प्रशांत झोडे हे ब्रह्मपुरी ते कोलारी रस्त्यावर गस्तीवर होते. दरम्यान त्यांना देऊळगाव ते बेलगाव रस्त्यावरील पुलाजवळ विनाक्रमांकाचा रेतीने भरलेला ट्रॅक्टर येताना दिसला. त्यांनी ट्रॅक्टर चालकास थांबवून अवैध रेती उत्खनन व वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याने सदर रेती बेलगाव घाटातून उत्खनन केली असून वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन पंच समक्ष विना क्रमांकाचा ट्रॅक्टर किंमत ४ लाख रुपये, निळ्या रंगाची ट्रॉली किंमत १ लाख रुपये व १ ब्रास रेती किंमत ६ हजार रुपये असा एकूण ५ लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
             स्वराज कंपनीच्या विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये १ ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक केल्यामुळे ट्रॅक्टर चालक आरोपी रितीक रवींद्र बरडे (वय २४, रा. कोलारी) याच्याविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  Post Views:   1050


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी