स्व. किसनलालजी मदनगोपालजी भैय्या फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
- फाउंडेशन दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थिनींना गणवेश वाटप करीत असते. या वर्षी वर्ग पाचवी च्या 199 विद्यार्थिनींना गणवेश वाटप केला. सदर स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ब्रम्हपुरी:- स्थानिक नेवजाबाई हितकारणी कन्या विद्यालय ब्रह्मपुरी येथे दिनांक 2 जुलै 2025 ला गणवेश वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या प्रित्यर्थ कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा गणवेश वितरक माननीय श्री. अशोकजी भैय्या साहेब सचिव, नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रह्मपुरी, प्रमुख अतिथीच्या स्थानी माननीय श्री. सुभाषजी बजाज साहेब सदस्य, नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्था ब्रह्मपुरी, माननीय बनपूरकर मॅडम मुख्याध्यापिका ने.ही. कन्या विद्यालय, ब्रह्मपुरी, उपमुख्याध्यापक माननीय श्री. निखारे सर पर्यवेक्षिका माननीय सौ.खंडाते मॅडम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमांचे पूजन व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय निखारे सर यांनी केले. इयत्ता पाचवीच्या एकूण 199 विद्यार्थीनींना स्वर्गवासी किसनलालजी मदनगोपाल जी भैया फाउंडेशन तर्फे गणवेश वितरित करण्यात आले.
याप्रसंगी माननीय भैय्या साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये गणवेशाचे महत्त्व ,गरज व भविष्यात प्राविण्य प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात असे सांगितले. प्रमुख अतिथी माननीय बजाज साहेब यांनी विद्यार्थिनींना ध्येय निश्चित करा व त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करा असे सांगितले. माननीय बनपूरकर मॅडम यांनी शिस्तीचे पालन करावे याविषयी मार्गदर्शन केले. माननीय खंडाते मॅडम यांनी विद्यार्थिनींना स्वच्छता विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ धांडे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन माननीय बावनकुळे मॅडम यांनी केले.