दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत वन्यजीव सप्ताह साजरा

   

ब्रम्हपुरी/का.प्र.
 आपला देश जैवविविधतेने नटलेला आहे. या जैवविविधतेतील वन्यजीव मानवी जीवनाचाही अविभाज्य घटक आहेत. या वन्यजीवांच्या परस्परसंबंधांविषयी, निसर्गातल्या विविध घडामोडींमध्ये असलेल्या त्यांच्या सहभागाविषयी माहिती व्हावी, त्या दृष्टीने जनजागृती व्हावी, यासाठी १९५४ सालापासून दरवर्षी भारत सरकारच्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ वाइल्डलाईफ’ तर्फे ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा ‘भारतीय वन्यजीव सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो. वनविभाग, ब्रम्हपुरी अंतर्गत येणार्‍या दक्षिण ब्रम्हपुरी परिक्षेत्रामध्ये दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२५ ते ०७ऑक्टोंबर २०२५ पर्यंत दक्षिण ब्रम्हपुरी परिक्षेत्रा अंतर्गत येणार्‍या उपक्षेत्र व नियतक्षेत्रा मध्ये वन्यजीव सप्ताहचा कार्यक्रम पार पडला. 
 सदर कार्याक्रमाकरीता गावागावामध्ये जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. यात वन्यप्राण्यांच्या अधिवासात होणार्‍या मानवी घुसखोरीमुळे, वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे वन्यप्राणी त्यांच्या अधिवासातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. अधिवासाचा र्‍हास, अवैध शिकार, विकास प्रकल्प यांमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासासह त्यांचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. त्यामुळे या सर्वांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने संरक्षित क्षेत्रात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. जंगल क्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, हा त्यामागचा खरा उद्देश असून तसेच १९५२ मध्ये धोक्यात असलेल्या प्रजातींच्या संवर्धनाच्या उद्देशाने वन्यजीव सप्ताहाची संकल्पना सुरू झाली. वन्यजीव संवर्धनासाठी भारत सरकारने ‘भारतीय वन्यजीव मंडळ' ची स्थापना केली. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ सारखे कायदेही अस्तित्वात असल्याची यावेळी माहिती देण्यात आली. 
  तसेच गावातील जनतेला जंगला विषयीचे महत्व पटवून देण्यात आले. वन्यप्राण्यांविषयी माहिती देण्यात आली. जंगलामध्ये जात असतांना वन्यप्राण्यांपासून स्वत:चे बचाव कशा पद्धतीने करता येईल, या विषयी माहिती देण्यात आली. गांवातील शाळांमध्ये जावून मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या दृष्टिकोणातून सापांविषयी माहिती देण्यात आली. सापांविषयी माहिती देण्याकरिता स्वॉब समितीचे सदस्यगण उपस्थित होते. उपस्थित समितीने सापांविषयी माहिती दिले. सदर कार्यक्रमाला ए.व्हि.सोनडवले वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) दक्षिण ब्रम्हपुरी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, व अन्य वनकर्मचारी, स्वॉब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

  Post Views:   32


संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी